Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीआज ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; गडचिरोली शहरात खळबळ..

आज ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; गडचिरोली शहरात खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना आज,सोमवार १६ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गडचिरोली शहराच्या लांझेडा वार्डात घडली.सचिन कोल्हुरवार वय ३५ वर्षे, रा.विवेकानंद नगर,गडचिरोली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर महेश बुरांडे असे आरोपीचे नाव असून प्राथमिक माहितीनुसार,पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून सदरची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.घटना घडताच आरोपी महेश बुरांडे घटनास्थळावरून फरार झाला.घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
माहितीनुसार,मृतक सचिनने २०१९ मध्ये आरोपी महेश बुरांडे याला सुमारे सव्वा लाख रुपये फर्निचर बनवण्यासाठी दिले होते.मात्र,महेशने फर्निचर तयार करून न देता पैसे परत करण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे,नेहमी दोघांमध्ये खटके उडायचे.अश्यातच आज महेशने सचिनला लांझेडा वार्डातील आपल्या घरी,जिथे तो फर्निचर बनवण्याचे काम करतो,तिथे बोलावले होते.सचिन हा आपल्या परिचित दीपक नंदेश्वर याच्यासोबत त्या ठिकाणी गेला.त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीदरम्यान आरोपी महेशने घराच्या आतून मिरची पावडर आणून अचानक सचिन आणि प्रत्यक्षदर्शी दीपक नंदेश्वर यांच्या अंगावर फेकली. त्यामुळे दोघे काहीकाळ गोंधळलेल्या अवस्थेत असतांना महेशने संधी साधत फर्निचर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार अवजाराने सचिनवर वार केले.या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दीपक नंदेश्वर असून तो घटनेच्या वेळी सचिनसोबत उपस्थित असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.घटनेने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!