Saturday, August 29, 2026
Homeभंडाराधान घोटाळा प्रकरणातील निलंबित सहाय्यक सचिव सेवेतून बडतर्फ..

धान घोटाळा प्रकरणातील निलंबित सहाय्यक सचिव सेवेतून बडतर्फ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाजलेल्या धान घोटाळा आणि प्रशासकीय अनियमिततेप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून निलंबित असलेले सहायक सचिव श्रीकांत दोनाडकर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आला.लाखांदूर बाजार समितीमध्ये २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांमध्ये शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान खरेदी केंद्र चालवण्यात आले होते.या केंद्रावर कोट्यवधी रुपयांचा धान घोटाळा झाल्याचा आरोप विद्यमान संचालक मंडळाने केला होता.या घोटाळ्या प्रकरणी पणन विभागाकडे तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.शासनाने केलेल्या लेखापरीक्षण अहवालात या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आणि बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजातही अनियमितता असल्याचे सिद्ध झाले होते. लेखापरीक्षण अहवालातील गंभीर ताशेऱ्यांनंतर संचालक मंडळाने काही महिन्यांपूर्वी सहाय्यक सचिव दोनाडकर यांना निलंबित केले होते.या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तत्कालीन प्रशासक आणि सहाय्यक सचिवांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रारही करण्यात आली होती.अखेर समितीच्या प्रतिमेला तडा गेल्याचे आणि आर्थिक नुकसान झाल्याचे कारण देत दोनाडकर यांना कायमचा घरचा रस्ता दाखविण्यात आला म्हणजेच नोकरीतून कायमचे काढण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!