- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शहराच्या रमाबाई आंबेडकर वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेस अटक करून घटनास्थळावरून १ हजार रुपये रोख,२० हजार २० रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण २१ हजार २० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई बुधवार १ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली.४५ वर्षीय संगीता धारगावे ही मुख्य आरोपी असून ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून व बाहेरील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले. तिच्यासोबत अन्य दोन आरोपीही यात सामील असल्याचे आढळून आले आहे.प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन भंडारा येथे अप.क्र. १३४६/२०२५ अन्वये कलम३,४, ५ (१)स्त्री अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- Advertisement -

