Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीधक्कादायक..! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करू पाहणाऱ्या नराधमास अटक.. - कोरची तालुक्यातील घटना..

धक्कादायक..! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करू पाहणाऱ्या नराधमास अटक.. – कोरची तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात धक्कादायक तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे.एका अल्पवयीन मतीमंद मुलीला फुस लावुन बांधकाम सुरु असलेल्या घरात घेवुन जात अत्याचार करू पाहणाऱ्या ५५ वर्षीय नराधमास एका चहा टपरी चालक महिलेच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला असल्याची घटना काल,बुधवारी १ ऑक्टोंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोरची शहरात घडली असून आज,गुरुवार २ ऑक्टोंबर रोजी सर्वत्र उघडकीस आली. बंडू सहारे वय ५५ वर्षे रा. हेटाळकसा,ता.कोरची, जि.गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव असून प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन कोरची पोलीस स्टेशन येथे अपराध क्र.११७/२०२५ कलम ६४ (२) (आय),(के),६५ भारतीय न्याय सहिता सह कलम ४ (२),६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी बंडू सहारे हा काल बुधवारी दुपारच्या सुमारास कोरची शहरातून सायकल घेऊन एका अल्पवयीन मतीमंद मुलीला फुस लावुन बांधकाम सुरु असलेल्या घरात घेवुन जात असतांना एका टपरी चालक महिलेने बघितले.त्यानुसार रस्त्याने जात असलेल्या दोन आशा वर्कर यांना याबाबत माहिती दिली.लागलीच तिघीही बांधकाम सुरु असलेल्या घरात गेल्या असता आरोपी हा पिडीत अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग करतांना आढळून आल्याने पिडीतेला आरोपीच्या तावडीतून सोडवले.अश्यातच आरोपी बंडू सहारे हा आपल्या सायकलवर पळुन जात असतांना महिला व आशा वर्कर यांनी आरडाओरड केल्याने आजुबाजुला असलेल्या नागरिकांनी आरोपीस पकडले.त्यानुसार कोरची पोलिसांना माहिती देण्यात आली आणि एका अल्पवयीन मतीमंद मुलीला फुस लावुन तिच्या मानसिकतेचा फायदा घेवुन शारिरीक संबंध प्रस्तापित केले,अशी फिर्याद दिल्याने बंडू सहारे याचेवर कोरची पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कोरची ठाण्याचे एपीआय मुकुंद देशमुख करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!