Thursday, June 25, 2026
Homeगोंदियाउभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार दोघे ठार तर एकजण गंभीर जखमी..

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार दोघे ठार तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या तिघांपैकी दोन तरुणांवर काळाने झडप घातल्याची घटना काल बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या दुचाकीस्वारांनी तपासणी नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी नेऊन आदळली.यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.तीसऱ्याला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.संजय मानकर याचा जागीच मृत्यू झाला,तर आशिष फुन्ने याचा छुरिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला.तर श्यामकुमार भोयर याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर राजनांदगाव येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रायपूर येथे हलविण्यात आले.तिघेही गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिलापूर/भोयरटोला येथील रहिवासी असून ते एमएच ३५,५१७५ क्रमांकाच्या दुचाकीने छत्तीसगड राज्याच्या डोंगरगड येथील माँ बम्लेश्वरी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते.जात असतांना वाटेतील चिचोला तपासणी नाक्यावर रायपूरकडे जाणारा एक ट्रक उभा होता.ट्रक उभा असतांनाच दुचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.नियंत्रण सुटताच दुचाकी थेट ट्रकच्या मागील भागास जाऊन जोरदार धडकली.धडक इतकी भीषण होती की,दुचाकीचा समोरील भाग आणि ट्रकच्या मागील भागाचा चुराडा होऊन तिघेही बाजूलाच कोसळले.यात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण रुग्णालयात उपचार घेत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!