Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील तृतीय सत्राचा निकाल जाहीर.. - आरमोरीच्या सुजाता अवचट,तर...

नाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील तृतीय सत्राचा निकाल जाहीर.. – आरमोरीच्या सुजाता अवचट,तर गडचिरोलीचे राजेंद्र सोनटक्के व पुरुषोत्तम दहिकर विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने मासिक उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर महिन्याला ही स्पर्धा विनाशुल्क घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत कवींना दिलेल्या विषयांवर कविता सादर करायची असून या कवितांमधून तीन उत्कृष्ट कवितांची निवड करण्यात येते.या कवितांना मासिक सर्वोत्कृष्ट कविता व कवीला सर्वोत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासणे हा स्पर्धेमागचा उद्देश असल्याने पुरस्कृत कवींना पुरस्कार म्हणून पुस्तके व आकर्षक प्रमाणपत्राने नाट्यश्री वार्षिक महोत्सवात मान्यवरांस गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे तृतीय सत्र नुकतेच पार पडले असून या सत्राकरीता मराठा आंदोलन,गणेश वंदना,तसेच मातृशक्तीचा जागर,असे तीन विषय देण्यात आले होते. यात २८ कवींनी सहभाग नोंदवून दिलेल्या तीन विषयांवर एकूण ५६ कविता सादर केल्या होत्या.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून आरमोरी येथील सुजाता एन.अवचट यांच्या मराठा आंदोलन या विषयावरील मराठा आरक्षण या कवितेस,गडचिरोली येथील ज्येष्ठ कवी राजेंद्र यादवराव सोनटक्के यांच्या गणेश वंदना या विषयावरील जय गणेशा या कवितेस व पुरुषोत्तम दहिकर यांच्या मातृशक्तीचा जागर या कवितेस सर्वोत्कृष्ट पुरस्कार घोषित करण्यात आले आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर चंद्रपूर,प्रसिद्ध संशोधक प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी केले आहे.
कवींच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या स्पर्धेत प्रामुख्याने खेमदेव हस्ते,अशोक कांबळे,आत्माराम विठ्ठल बरडे,कृष्णा कुंभारे,बाबुलाल राठोड, डॉ.चंद्रकांत लेनगुरे, समृध्दी पाथर,संजय कुनघाडकर,नथ्थुजी चिमुरकर, यामिनी मडावी,सुरेखा बोरकर,पुरुषोत्तम दहिकर,सुनील बावणे,वंदना मडावी, केवळराम बगमारे,रोशनी दाते,उकंडराव नारायण राऊत,शैला चिमड्यालवार, पी.डी.काटकर,सोनाली रायपुरे-सहारे,राजेंद्र यादवराव सोनटक्के,डॉ.केशनी हटवार,वंदना सोरते,हरिष डी.नैताम, मधुकर दुफारे, सुजाता अवचट,प्रा.सरिता बुटले,वसंत चापले इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील वार्षिक कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!