Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन…-प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे...

देसाईगंज स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन…-प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे वेधले लक्ष…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ,पुणेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधावे व शासनाकडून तात्काळ कार्यवाही व्हावी; यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रम आज राज्यभर हाती घेण्यात आला.त्यानुसार आज,गुरुवार दिनांक-२७ जून ला सकाळी ११ वाजता देसाईगंज स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय देसाईगंज समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आले.

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ ही ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्लीशी संलग्न संस्था असून स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी,मागण्या,समस्या तसेच शासन निर्णयांची अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक आहे.मागील बऱ्याच वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या,अडचणी,समस्या यावर महाराष्ट्र राज्यातील शासनाकडून कोणतीही कार्यवाही व निर्णय घेण्यात आलेला नाही.अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत दि.१० जानेवारी २०२४ रोजी राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.सदरच्या बैठकीत राज्यातील धान्य दुकानदारांच्या तसेच मार्जीनमध्ये ५० रूपयांची वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.तसेच लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल,असे सुतोवाच मंत्र्यांकडून करण्यात आले होते.परंतु आजपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा किंवा बैठकही झाली नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी,समस्या व इतर प्रश्नांकडे शासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. यासाठी देसाईगंज स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारून निवेदन सादर करण्यात आले.

धरणे आंदोलनात देसाईगंज स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका सचिव अरुण कुंभलवार,तालुका उपाध्यक्ष सुरेश दुनेदार,कार्याध्यक्ष वासुदेव दुफारे तसेच तालुक्यातील संपूर्ण स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!