Sunday, August 30, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्यात यावी…-अन्यथा येत्या१८ जुलैला...

देसाईगंज शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्यात यावी…-अन्यथा येत्या१८ जुलैला चक्काजाम आंदोलन, काँग्रेसच्या डाॅ.शिलु चिमुरकरांचा भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना अल्टिमेटम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेसाठी भुमिअभिलेख कार्यालयाच्या वतिने करण्यात आलेल्या मागणीनुसार येथील नगर परिषदेच्या वतिने जवळपास ८० टक्के रक्कम २०१८ मध्ये शासन जमा करण्यात आले.दरम्यान शहराचा सिटी सर्व्हे करण्यात न आल्याने येथील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भुमिअभिलेख कार्यालयाला निवेदन देऊन आंदोलन केले असता सिटी सर्व्हे सुरु करण्यात आला.मात्र,सिटी सर्व्हेची एकुणच संथ गती पाहु जाता येथील गरजु गोरगरीब नागरिकांना आखिव पत्रीके अभावी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्यात यावी; अन्यथा विरोधात येत्या १८ जुलै २०२४ रोजी कुरखेडा टी-पाईन्ट येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा अल्टिमेटम काँग्रेस कार्यकर्त्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी येथील भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना दिला आहे.

शहरातील गरजु व पात्र लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देता यावे करीता शासकीय स्तरावरुन प्रधानमंत्री आवास योजना,शबरी घरकुल योजना,रमाई घरकुल योजना यासह विविध योजना राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ गरजुंना देता यावा करीता येथील नगर प्रशासनाने देसाईगंज शहराचे सिटी सर्व्हे करून अतिक्रमण धारकांवर मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात नगर परिषदेच्या मान्यतेने देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयीन पत्राच्या मागणीनुसार भुमापन कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपयाची मागणी करण्यात आली असता देसाईगंज नगर परिषद कार्यालयाकडून ४ जानेवारी २०१८ रोजी २ कोटी ५० लाख,६ जुलै २०१८ रोजी ३ लाख तसेच १९ डिसेंबर २०१८ ला २५ लाख असे एकूण २ कोटी ७८ लाख रुपये देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयास अदा केले आहेत.

देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेचा तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ९ एप्रिल २०१८ रोजी मोठ्या थाटामाटात सुभारंभ करण्यात आला होता.अदा करण्यात आलेल्या रकमेची टक्केवारी एकुण मान्यताप्राप्त रकमेच्या ८० टक्के असुनही त्या प्रमाणात मात्र अद्यापही सिटी सर्व्हेचे काम करण्यात आले नाही.त्यामुळे येथील नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील नागरीकांना पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक असतांना शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करून सिमा निश्चित करण्यात आल्या नसल्याने शासकीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेली घरकुल योजना रखडलेली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेचे काम यथाशिघ्र पुर्ण करून येथील नागरीकांना आखिव पत्रिका देण्यात याव्यात,अन्यथा १८ जुलै २०२४ रोजी कुरखेडा टी-पाईन्ट येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा अल्टिमेटम काँग्रेस कार्यकर्त्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना दिला आहे.याबाबत भुमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी काय कारवाई करतात याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.

या प्रसंगी पिंकू भाऊ बावणे युवा नेता वडसा,विजय पिल्लेवान, नरेश लिंगायत,भूमीत मोगरे,अमित सलामे,आकाश शिऊरकर,सुनील चिंचोलकर,भूमेश्वर निमजे,रजनी आत्राम,विमल मेश्राम,रीना शेंडे,मालता गेडाम आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!