Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरवन विकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल,वनरक्षक आणि वन मजूर निलंबित..

वन विकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल,वनरक्षक आणि वन मजूर निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवीत चंद्रपूर वन विकास महामंडळाने(FDCM)वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल,वनरक्षक आणि वन मजूर अशा सहा कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. त्यामुळे वन विकास महामंडळ आणि वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील पांडुरंग आत्राम,वनपाल विपुल संभाजी आत्राम,उमेश प्रल्हाद डाखोरे,नेताजी मोहन बोराडे,वनरक्षक प्राची देवकुमार चुनारकर,वनमजूर किशोर हिरामण गेडाम अशी निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.चंद्रपूर वन विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४१२ मध्ये वृक्षतोड झाली.वृक्षतोड केलेला माल आरोपीकडून जप्त करण्यात आला.जप्त केलेला माल हा लिलाव करण्याची चर्चा आहे. मात्र,कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी याबाबत निश्चित कारण सांगण्यात आलेले नाही.तरी वन विकास महामंडळाने केलेली ही कार्यवाही जिल्हातील मोठी कार्यवाही ठरली आहे. या कार्यवाहीने वन विकास महामंडळ आणि वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!