Monday, September 21, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे “स्वच्छता ही सेवा-२०२५” अंतर्गत भव्य स्वच्छता रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे...

देसाईगंज येथे “स्वच्छता ही सेवा-२०२५” अंतर्गत भव्य स्वच्छता रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA),भारत सरकार यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत “स्वच्छता ही सेवा- २०२५” या अभियानाचा भाग म्हणून देसाईगंज नगरपरिषद मार्फत स्वच्छता पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या कालावधीत अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता व त्यांचे परिवर्तन,सार्वजनिक जागांची स्वच्छता,सफाई मित्र सुरक्षा शिबीर,तसेच जनजागृतीसाठी स्वच्छता रॅली यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
२ ऑक्टोंबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वच्छ भारत दिनाच्या निमित्ताने विशेष स्वच्छता रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन सतीश चौधरी प्रशासक तथा मुख्याधिकारी,नगरपरिषद देसाईगंज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उमाकांत कवासे यांनी भूषविले.तर प्रमुख अतिथी म्हणून रुपेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी देसाईगंज उपस्थित होते.तसेच शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे, नगरपरिषदेचे विभाग प्रमुख स्वप्निल हमाने,प्रफुल हटवार,सौरभ नंदनवार,निशांत घोणमोडे,योगिता निंबार्ते,अनिल गोवर्धन,लवकुश उरकुडे,तसेच  पुरुषोत्तम मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,लुणकरन चौधरी,चैतन्यदास विधाते आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातून निघालेल्या स्वच्छता रॅलीचे नेतृत्व स्वतः मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी केले.तर त्यांना शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे व नगरपरिषद विभाग प्रमुखांनी साथ दिली.या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी स्वच्छतेबद्दल जनजागृती केली.रॅलीची सांगता महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे झाली.यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते,भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गांधीजी व शास्त्रीजींना अभिवादन केले.
मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तसेच गांधीजींचे सत्य-अहिंसा तत्त्वज्ञान आणि शास्त्रीजींचा “जय जवान,जय किसान” हा संदेश आजच्या पिढीसाठी किती मार्गदर्शक आहे,हे अधोरेखित केले.अध्यक्ष उमाकांत कवासे यांनी शाळेच्या समस्या मांडल्या.तर चैतन्यदास विधाते यांनी ग्रामविकासाच्या गरजांबाबत मागणी केली.शेवटी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन मंगेश तुपट यांनी केले.तर कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम ईश्वर गहाने,अर्पणा जडे,तृषाली सुखदेवे,प्राची खरकाटे,प्रियंका तलमले व प्रमिला खरकाटे यांनी घेतले.कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी एकमुखाने घेतलेल्या स्वच्छता प्रतिज्ञेने करण्यात आली.
  •        रॅली व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!