Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरकायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे; मागील वर्षभरात मूल तालुक्यात हत्येच्या सहा घटना..!

कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे; मागील वर्षभरात मूल तालुक्यात हत्येच्या सहा घटना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यात मागील वर्षभरात हत्येच्या सहा घटना घडलेल्या असून गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत असल्याने मूल शहर गुन्हेगारीचे माहेरघर ठरले आहे.अश्यातच गुन्हेगारीचा नायनाट करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.नुकतेच २६ सप्टेंबर २०२५ रोजी दागिन्यांच्या लालसेपोटी मूल शहरातील वॉर्ड क्रमांक-१४,भीमवाडी येथील रहिवासी सेवानिवृत केंद्रप्रमुख सुनील गेडाम यांची हत्या करण्यात आली होती.प्रकरणातील आरोपींना तात्त्काळ फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी मूल शहरवासीयांनी काल शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीय नागरिकांना हद्दपार करावे,अशीही मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे,एनडीटिव्ही मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, सन २०२४ मध्ये केवळ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४२ हत्या,तर ५२ जीवघेणे हल्ले झाल्याची नोंद करण्यात आली आहे.सदरचा अहवाल चंद्रपूर जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर प्रकाश टाकतो आहे.गोळीबार,हत्या,चोरी-चकारी,हाप मर्डर,दरोडे व इतर गुन्हेगारीने चंद्रपूर जिल्हा ढवळून निघत आहे.शांत म्हणवल्या जाणाऱ्या जिल्ह्याला जणूकाही कुणाची नजर लागली की काय?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!