Monday, August 3, 2026
Homeचंद्रपूरतहसीलदार निलंबित; तहसील कार्यालय परिसरात शेतकऱ्याने विष प्राशन केल्याचे प्रकरण अंगलट..!

तहसीलदार निलंबित; तहसील कार्यालय परिसरात शेतकऱ्याने विष प्राशन केल्याचे प्रकरण अंगलट..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तहसील कार्यालय परिसरात प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली होती.परमेश्वर ईश्वर मेश्राम वय ५५ वर्षे,रा.मोरवा, ता.भद्रावती असे शेतकऱ्याचे नाव असून कुरोडा गावातील सर्व्हे क्र.८७ वरील शेती ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.त्यांच्या वडिलांनी हयातीतच ही जमीन विधिवत त्यांच्या नावावर केली होती.मात्र,त्यानंतर इतर नातेवाइकांनी आक्षेप घेत न्यायालयात दावा दाखल केला होता.या प्रकरणात न्यायालयाने मेश्राम यांच्या बाजूने निकाल दिला असून, जमीन त्यांच्याच नावे असल्याचे स्पष्ट आदेश दिले. यानंतर त्यांनी फेरफारसाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता.मात्र,महिन्यांनंतरही महसूल विभागाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.उलट,विविध कारणांनी प्रकरण प्रलंबित ठेवले गेले.वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांना केवळ निराशाच पदरी पडली.शेवटी,मेश्राम यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच विषारी द्रव प्राशन केले होते.बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.घटनेमुळे स्थानिक शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत तहसील प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता.दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून पीडित शेतकऱ्याला न्याय मिळावा,अशी मागणी करण्यात आली होती.अश्यातच आता प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाने महसूल अधिनियम १९६६ आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम १९६९ च्या उल्लंघनाबद्दल, जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी भाद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांचेसह नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

तलावात बुडालेल्या तरुणाचा आज सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या धानोरी गावातील २२ वर्षीय तरुण काल रविवारच्या सायंकाळी गाव तलाव परिसरात आंघोळ करण्यासाठी उतरला असता क्षणात दिसेनासा झाल्याने परिसरात एकच...

गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी जाधव यांची बदली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड येथे बदली करण्यात आली असून आज,सोमवार ३ ऑगस्ट रोजी त्यांना गडचिरोली...

सावधान..! तुमच्याही बँक खात्याचा होऊ शकतो सायबर फसवणुकीसाठी गैरवापर.. – नागरिकांनी आपले बैंक खाते,एटीएम कार्ड,पासबुक कुणालाही वापरण्यासाठी देऊ नये.. – आपले बँक खाते...

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारीचा नवीनच गंभीर प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनेक बँक खातेधारक अडकल्याचे स्पष्ट झाले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!