Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर; तब्बल दोनशे रक्तदात्यांनी केले रक्तदान..

देसाईगंज पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर; तब्बल दोनशे रक्तदात्यांनी केले रक्तदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पोलिस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून आज,गुरुवार ८ जानेवारी रोजी  गडचिरोली पोलिस दल तथा देसाईगंज पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज शहराच्या क्रीडा संकुल या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तब्बल दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले.प्रसंगी कुरखेडा उपविभागिय पोलिस अधिकारी रविन्द्र भोसले व देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अजय जगताप यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे,असे आवाहन करताच देसाईगंज शहरातील शेकडो युवकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.त्यांनी ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश देत उपस्थित तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आगरकर,पोलीस उपनिरीक्षक मनिष गोडबोले,प्रेमकुमाप दांडेकर, महिला पोलिस उपनिरिक्षक कोमल माने,अनिल डेरकर,पवन नायमाने,पोलीस कर्मचारी निलेश कडव, दिनेश सोनकुसरे,दिनेश बन्सोड,राजु उराडे,कुंदन शेन्डे यांनी योगदान दिले.सदर कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष सचिन खरकाटे, कुलदीप आमले,अतुल दुणेदार, बादल रहाटे तसेच पोलिस अधिकारी,कर्मचारी यांचेसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!