Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरभूतबाधा उतरविण्यासाठी तांत्रिक पूजा; सुशिक्षित तरुणास लुटले.. - दोन भोंदू मांत्रिकांना अटक..

भूतबाधा उतरविण्यासाठी तांत्रिक पूजा; सुशिक्षित तरुणास लुटले.. – दोन भोंदू मांत्रिकांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-तंत्रज्ञानाच्या युगात आजही अनेकजण तंत्र-मंत्र व अघोरी विद्येवर विश्वास ठेवतात.त्यामुळेच अनेक भोंदू मांत्रिकांची फोळणी साधत असते आणि अनेकांना गंडा घातला जातो.अश्याच प्रकारे दोन भोंदू मांत्रिकांनी एका ३१ वर्षीय सुशिक्षित तरुणास भूतबाधा उतरविण्यासाठी तांत्रिक पूजा करून तब्बल १ लाख ४५ हजार ५०० रुपयांनी गंडा घातल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यात उघडकीस आली आहे.प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने कुही पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता(बीएएनएस)कलम ३१८(४),३(५)तसेच महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम २०१३ च्या कलम ३ (२)अन्वये गुन्हा नोंदवून दोन भोंदू मांत्रिकांना अटक केली आहे.संदीप गोविंदा वाघमारे वय २७ वर्षे व रवींद्र नंदू वाघमारे वय २५ वर्षे दोघेही रा.पालोरा,ता. पारशिवनी,जि.नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी भोंदू मांत्रिकांची नावे आहेत.तर गोविंदा विठ्ठल बावनकर वय ३१ वर्षे,रा.वेलतूर,ता.कुही असे  ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या सुशिक्षित तरुणाचे नाव असून तो गुजरातच्या सुरत शहरात नोकरीत करतो.
पिडीत गोविंदा बावनकर हा सप्टेंबर २०२५ मध्ये काही कामानिमित्त सुरतहून वेलतूर येथील त्याच्या राहत्या घरी परतला होता.दरम्यान,भोंदू मांत्रिक संदीप व रवींद्र २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर २०२५ या काळात अनेकदा गोविंदाच्या घरी गेले होते.त्यांनी गोविंदाला विश्वासात घेत त्याला ‘तुला कुणी तरी करणी केली आहे.’तुला भूतबाधा झाली आहे,ही बाधा उतरविली नाही तर मोठे संकट येईल’, अशी बतावणी केल्याने तो घाबरला होता.ही भूतबाधा उतरविण्यासाठी तांत्रिक पूजा करावी लागेल. पूजेसाठी विशिष्ट प्रकारची जडीबुटी खरेदी करून आणावी लागले.त्यासाठी पैशाची गरज भासणार आहे, अशी बतावणी केली.त्या दोघांच्या सांगण्यावर गोविंदाचा विश्वास बसल्याने दोघांनीही त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने १ लाख ४५ हजार ५०० रुपये उकळले.त्यांचा पैसे मागण्याचा प्रकार वाढत चालल्याने यात आपली फसवणूक झाल्याचे काही दिवसांनी गोविंदाच्या लक्षात आले.त्यामुळे त्याने पोलिस ठाणे गाठून दोन दिवसांपूर्वी तक्रार नोंदविली. लागलीच वेलतूर पोलिसांनी दोन्ही मांत्रिकाविरुद्ध गुन्हा नोंदवून संदीप वाघमारे व रवींद्र वाघमारे या दोघांचा शोध सुरू केला.दोघेही त्यांच्या मूळगावी पालोरा येथे नसल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे दोघेही नेमके कुठे आहेत,ते शोधून काढले आणि त्यांना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!