Wednesday, September 2, 2026
Homeमुंबईज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड.. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ...

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड.. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ यांना श्रद्धांजली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ.माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील,अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ.माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ,पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष,नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ.माधव गाडगीळ यांचे काल बुधवारी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे रात्री ११ वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ.गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण,जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज,अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस शोकसंदेशात म्हणाले की,डॉ.गाडगीळ यांनी पर्यावरणविषयक जाणिव जागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केलेत.पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.डॉ.गाडगीळ यांच्या योगदानाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना २०२४ मध्ये यूएनईपीच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित केले होते.सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली.मात्र,त्यांनी स्वतला ‘जनतेचा वैज्ञानिक’च मानलं.पर्यावरण क्षेत्रातील कार्याने महाराष्ट्र सुपुत्र डॉ.गाडगीळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली.या अर्थाने त्यांची पर्यावरण जतन,संवर्धन क्षेत्राला उणीव भासत राहील. त्यांच्या निधनामुळे एका ऋषीतुल्य मार्गदर्शकाला आपण मुकलो असून गाडगीळ कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला आहे.त्यांच्यासह गाडगीळ यांचे चाहते,त्यांचे संशोधक विद्यार्थी यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
(साभार-मुख्यमंत्री सचिवालय(जनसंपर्क कक्ष)मुंबई.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!