Sunday, July 19, 2026
Homeभंडाराअवैध रेतीचा झांगडगुत्ता; चक्क आमदारांच्या राईस मिल परिसरात आढळले रेतीचे १७ टीप्पर.....

अवैध रेतीचा झांगडगुत्ता; चक्क आमदारांच्या राईस मिल परिसरात आढळले रेतीचे १७ टीप्पर.. – साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रेतीच्या माध्यमातून बक्कळ पैसा व रातोरात गरिबी हटाव मोहीम होत असल्याने अनेकजण अवैध रेतीचा खेळ करू लागलेत.मात्र,अवैध रेतीचा खेळ करण्यासाठी मोठ्या समीकरणांची जुळवाजुळव आणि मोठा दम हवा असतो.ते फक्त राजकीय वरदहस्तानेच शक्य असल्याने ‘मै उसका आदमी हू’ असे म्हणत अनेकजण आपली पोळी शेकतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्यात अवैध रेतीचा झांगडगुत्ता उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे,मोहाडी-तुमसर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या मालकीच्या जय किसन राईस इंडस्ट्री मोहगाव देवी(वरठी)या राईस मील परिसरात महसूल विभागाच्या पथकाने काल बुधवारी धाड टाकून रेती भरलेले १७ टिप्पर जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदर टिप्पर कुणाच्या मालकीचे,तस्करीची रेती कुणाची,यामागील म्होरक्या कोण? अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. महसूल विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल ६ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात १० आणि १२ चाकी असलेले १७ टिप्पर तसेच सुमारे १२० ते १५० ब्रास रेतीचा समावेश आहे.वाहन आणि रेतीच्या जप्तीनंतर वरठी आणि मोहाडी पोलिसांना सूचना देऊन पाचारण करण्यात आले.टिप्परवरील कारवाईसाठी उपप्रदेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले.त्यानंतर सर्व वाहने रेतीसह मोहाडी तहसिल कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. सदरची कारवाई सायंकाळी साडे पाच वाजताच्या दरम्यान सुरू झाली,ती सुमारे साडे सात वाजेपर्यंत चालली.
महसूल विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,वरठी तुमसर मार्गावरील जय किसन राईस इंडस्ट्री मोहगाव देवी या राईस मिलच्या मागील भागात मोठ्या संख्येने अवैध रेती भरलेले टिप्पर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार,तुमसरचे उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे,भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे,जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढीवे,मोहाडीच्या प्रभारी तहसीलदार विमल थोटे,नायब तहसीलदार श्रीधर कारेमोरे,भंडाराचे तहसीलदार संदीप माकोडे, वरठीचे मंडळ अधिकारी महादेव इप्पर,मोहाडीचे जगदीश कुंभारे यांच्यासह तलाठी व इतर कर्मचारी यांनी धाड टाकली व संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे,राजकीय वरदहस्त असेल तर प्रकरण तिथेच दबणार अन्यथा बोलबाला होणार,अशी वाणी
अनेकांच्या मुखातून बाहेर पडू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

व्हॉट्सॲपवरील ‘एपीके’ फाइलने केला घात; दहा लाखाला गंडा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका निवृत्त कर्मचाऱ्याला मोबाईल व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट 'एपीके' फाइल उघडणे चांगलेच महागात पडले आहे.फाईल उघडताच सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून त्यांच्या...

चीमुकलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या वृद्धाला अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक व किळसवाणा प्रकार समोर आला आहे.परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असलेल्या एका ४ वर्षीय चीमुकलिशी...

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!