उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील विविध अशासकीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत.बऱ्याच समित्यातील पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून निवड झालेल्या समित्यांतील अध्यक्ष व सदस्यांद्वारे विविध कार्ये पार पाडली जाणार आहेत.अशातच कित्तेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.त्यामुळे शासन स्तरावरून यावर कुठेतरी आळा घातला जावा; यासाठी तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठीत करण्यात आली आहे.त्यानुसार भ्रष्टाचार मुक्त तालुका करण्यासाठी देसाईगंज नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिन खरकाटे यांची देसाईगंज तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.सदरची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र सचिन खरकाटे यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.
खरकाटे यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून संपूर्ण नाही तर काही प्रमाणात देसाईगंज तालुका भ्रष्टाचार मुक्त करून,त्यानुसार कार्य करावे; अशी अपेक्षा अनेकांकडून केली जात आहे व पुढील वाटचालीस जनतेकडून तसेच मित्र परीवारांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
सचिन खरकाटे यांची देसाईगंज तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने,नियुक्तीचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,भाजपाचे गडचिरोली-चिमूर लोकसभा प्रमुख किसन नागदेवे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी (ग्रामीण),जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,माजी नगराध्यक्ष शालुलाई दंडवते,माजी नगरसेवक राजु जेठानी यांना दिले आहे.

