Monday, August 10, 2026
Homeअमरावतीअन् 'त्यांनी' चक्क कलाकारांनाच लिहिले पत्र…-तरुण पिढीसह अनेकजण ऑनलाइन गेमच्या विळख्यात…

अन् ‘त्यांनी’ चक्क कलाकारांनाच लिहिले पत्र…-तरुण पिढीसह अनेकजण ऑनलाइन गेमच्या विळख्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अमरावती :- सध्याच्याघडीला काहीजण सोडले तर अनेकांकडे अँड्रॉइड मोबाईल दिसून येतो.घरबसल्या देशातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील माहिती अँड्रॉइड मोबाईलमुळे एका क्लिकवर पाहणे सहजरित्या शक्य झाले आहे.अशातच आता ऑनलाइनच्या माध्यमातून पैसे जिंकण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी ऑनलाईन गेमिंगचा ट्रेण्ड सगळीकडेच वाढलेला दिसून येतो आहे.तरुण पिढीसह अनेकजण ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात सापडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.चित्रपट सृष्टीतील कलाकार,क्रिकेटपट्टू यांच्या कडून जाहिरातींद्वारे भुरळ घातली जात आहे.त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने अभिनेता शाहरुख खान, ऋतिक रोशन,क्रिकेटपटू विराट कोहली,महेंद्रसिंग धोनी यांना पत्र पाठवून ऑनलाइन गेमची जाहिरात करू नये; अशी मागणी केली आहे.या ऑनलाइन खेळांची जाहिरात करणाऱ्या कलाकार आणि क्रिकेटपटूंना ग्राहक पंचायतीच्या वतीने देशभरातून अनेक पत्रे पाठवली जात आहेत.अशी माहिती ग्राहक पंचायत अमरावतीचे जिल्हा निमंत्रक अशोक हांडे यांनी दिली आहे.

ऑनलाइन गेम तरुण पिढीसह प्रत्येकासाठी धोकादायक आहेत.त्याची सुरुवात मनोरंजनापासून होते.पण लवकरच त्याची सवय लागते.या व्यसनाला बळी पडलेली मुले,तरुणआणि महिलांना अस्वस्थता, निद्रानाश,एकाग्रतेचा अभाव,कर्जबाजारीपणा, नैराश्याने ग्रासले जाते.कधी कधी ती व्यक्ती आत्महत्येपर्यंत पोहोचते.अशी काही प्रकरणेही समोर आली आहेत.यावेळी ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ.नारायण मेहेरे,प्रांत सचिव नितीन काकडे,प्रांत संघटक डॉ.अजय गाडे,जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.विजय टोम्पे आदींनी अमरावती पोस्ट ऑफिसमधून संबंधित अभिनेते-क्रिकेटपटूंच्या नावे पत्रे पाठवली.

तरुण पिढीमध्ये या ऑनलाइन गेम्सच्या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे,या गेम्सची जाहिरात करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींनी गेमला दिलेले समर्थन आहे.ज्यामध्ये अभिनेता शाहरुख खान, ऋतिक रोशन, विराट कोहली,क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी,स्मृती मंदाना आदींचा समावेश आहे.या सर्व सेलिब्रेटींना जनमताचा आदर करताना आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून सर्व प्रकारच्या ऑनलाइन गेम्सचा प्रचार न करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!