Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर येथील ३६ वर्षीय इसम बेपत्ता…

देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर येथील ३६ वर्षीय इसम बेपत्ता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर येथील एक इसम गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना उघडकीस आली आहे.केशव शिवदास बेदरे (टोपण नाव- रामजी),वय ३६ वर्षे रा.शिवराजपुर,पोस्ट-कुरूड ता.देसाईगंज असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे.

केशव बेदरे हे घरच्यांना वा इतरांना काहीही न सांगता दिनांक- २६ जून रोजी सकाळच्या सुमारास घरून निघून गेलेत.सकाळी साडे दहाच्या सुमारास घरीच होते; मात्र,घरून गेल्यानंतर रात्र होऊनही घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी तसेच नातेवाईकांनी शोधाशोध केली.मात्र,केशव यांचा अजून पर्यंत पत्ता लागलेला नसल्याने देसाईगंज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

केशव यांचे वर्णन👇

उंची ५.८ फुट “, रंग -काळा सावळा,निळा नाइट पँट आणि कमळ निशाण असलेला टीशर्ट घालून घरून निघून गेले आहेत.तरी ज्या कुणा व्यक्तींना वा नागरिकांना केशव बेदरे दिसून आल्यास त्वरित खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे.

मोबाईल क्रमांक :- 8308084353/ 9756994583/9359002464/8007574474

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!