- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या माता वार्ड(आंबेडकर वार्ड) येथील डॉ.संजय भास्कर मेश्राम यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे काल,रविवार २३ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील विद्यापिठात आयोजित ४१ व्या दीक्षांत समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य पदवी(पीएचडी) बहाल करण्यात आली.
डॉ.संजय मेश्राम यांनी वर्ष २००८ ते २०१८ या कालखंडात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील आर्थिक समस्या व औद्योगिक स्थितीचे विषयावर विश्लेषणात्मक अध्ययन केले होते.त्यानुसार
व्यवसाय व्यवस्थापन(Bussiness Management)या विषयातील वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रात मेश्राम यांना आचार्य (Ph.D)पदवी बहाल करण्यात आली.अमरावती विद्यापीठात पार पडलेल्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई,विद्यापीठाचे कुलगुरू तथा इतर मान्यवर उपस्थित होते.यशाचे श्रेय डॉ.संजय मेश्राम यांनी आई-वडील,मार्गदर्शक डॉ.गोंडाणे,डॉ.वर्षा सुखदेवे,गुरुजन मारोती जांभूळकर,अनिल बोरकर,शिक्षक संतोष शेंडे तसेच सर्व मित्र मंडळीना दीले आहे.
- Advertisement -

