Thursday, October 15, 2026
Homeचंद्रपूरदहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करत असतांनाच कसेतरी वाटू लागले; शिक्षकाच्या मृत्यूने...

दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करत असतांनाच कसेतरी वाटू लागले; शिक्षकाच्या मृत्यूने हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-काळाचा घाला किती निष्ठुर म्हणावा.ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले,अश्यांनी गुणवत्ता  सिद्ध केल्याने त्यांचा सत्कार करत असतांनाच कसेतरी वाटू लागले आणि काही क्षणातच आनंदी वातावरणावर दुःखाचे सावट पसरले.काल शुक्रवारी दहावीचा निकाल लागला.बऱ्याच ठिकाणी शाळेतून प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतील शिक्षकवृंदांच्या वतीने सत्कार तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जातात.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत दोंतुलवार, विनायक काळे व इतर शिक्षकवृंद शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली लावण्या कैलास इंगोले हिचा सत्कार करण्यासाठी रात्री ७ वाजेच्या सुमारास गेले.सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असतांनाच उपस्थित शिक्षक विनायक काळे यांना कसेतरी वाटू लागले.दरम्यान,भोवळ येऊन खाली कोसळणार तेवढ्यातच सहकारी शिक्षकांनी त्यांना सावरले आणि तात्काळ विसापूर येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलवत असतांना वाटेतच मृत्यू झाला.विनायक महादेव काळे वय ६० वर्षे,रा. तुकडोजी चौक,विसापूर,ता.बल्लारपूर, जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या शिक्षकाचे नाव असून ते काही दिवसांपूर्वीच चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते व सध्या मानधन तत्त्वावर सेवा बजावत होते.अचानक घडलेल्या प्रसंगाने काळे कुटूंबीयावर मोठा आघात होऊन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!