Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरबापरे..! दुचाकीवर पती-पत्नी अन् समोर पट्टेदार वाघ..

बापरे..! दुचाकीवर पती-पत्नी अन् समोर पट्टेदार वाघ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दुचाकीने एका विवाह समारंभासाठी निघालेल्या पती आणि पत्नी समोरच भलामोठा पट्टेदार वाघ थेट त्यांच्या जवळच येऊन थांबला.भीतीने दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला.अश्यातच दोघांनी कुठलीही हालचाल वा आरडाओरड न करता शांत राहिल्याने मोठा अनर्थ टळून सुदैवाने वाघाने हल्ला न चढवता थोड्याच वेळात दिशा बदलली आणि शांतपणे जंगलात निघून गेला.वाघ नजरेआड होताच दाम्पत्याने सुटकेचा निःश्वास सोडला.सदरची चित्तथरारक घटना नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील चन्ना ते वेलतूर मार्गावर काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
सायंकाळचे सुमारे साडे पाच वाजले होते.कुही तालुक्यातील चन्ना ते वेलतूर जंगलमार्ग शांत होता. झाडांच्या सावल्या रस्त्यावर पसरल्या होत्या.शिक्षक नितीन खोब्रागडे पत्नीसह दुचाकीने  लग्नसमारंभासाठी वेलतूरकडे निघाले होते.जंगलाच्या मधोमध रस्त्याच्या कडेला बसलेला वाघ त्यांच्या नजरेस पडला आणि बोबडी वळली.समोर वाघ आणि आजूबाजूला घनदाट जंगल,काय करावे? हेच त्यांना सुचेनासे झाले.नितीन यांनी घाईघाईने दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र, गोंधळात गाडीचा तोल गेला आणि पत्नी रस्त्यावर पडल्या.पडल्याचा आवाज होताच वाघ सावकाश त्यांच्या दिशेने चालू लागला.तो क्षण अंगावर काटा आणणारा होता.काही अंतरावर उभा असलेला वाघ थेट त्यांच्या जवळ येऊन थांबला.भीतीने दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला होता. आरडाओरडा केला असता परिस्थिती आणखी बिघडू शकते,याची जाणीव असल्याने त्यांनी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.काही क्षण वाघ त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला.काही सेकंद जणू काळ थांबला होता.सुदैवाने वाघाने कोणताही हल्ला केला नाही.थोड्याच वेळात त्याने दिशा बदलली आणि शांतपणे जंगलात निघून गेला.वाघ नजरेआड होताच पत्नी रस्त्यावर पडल्याने त्या जखमी झाल्याने नंतर एका नागरिकाच्या मदतीने त्यांना वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले खरी,पण घडलेल्या प्रसंगाने बराच वेळ दाम्पत्त्यात धडकी भरली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!