Monday, July 27, 2026
Homeभंडारा'त्या' फरार डॉक्टरच्या शोधासाठी देशभरातील सर्व पोलिस ठाण्यांना पत्र.. - अल्पवयीन मुलीशी...

‘त्या’ फरार डॉक्टरच्या शोधासाठी देशभरातील सर्व पोलिस ठाण्यांना पत्र.. – अल्पवयीन मुलीशी सोनोग्राफी कक्षात गैरवर्तन केल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली शहरातील श्याम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने प्रकरणास वाचा फुटली.प्रकरणी ४५ वर्षीय
आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल रा.साकोली(शहर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ६४(२)(१),६५(१) तसेच पोस्को(POSCO) कायदा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार झाला. घटनेमुळे साकोली शहरात संताप व्यक्त करून विविध संघटनांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवून आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाईची मागणी केली.त्यानुसार साकोली पोलिसांनी आरोपीचा सर्वत्र शोध घेतला.परंतु अजूनपर्यंत त्याचा थांगपत्ता लागलेला नसल्याने भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेत आरोपी डॉक्टरच्या शोधासाठी लुक आउट सर्क्युलर जारी केला आहे.(लुक आउट सर्क्युलर म्हणजे एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी वा असा व्यक्ती देश सोडून कुठेही जाऊ नये,यासाठी नोटीस जारी करण्यात येते.)त्यातच देशभरातील सर्व पोलिस ठाण्यांना फरार डॉक्टरचा शोध घेण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे.सोबतच सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेस वरून सूचना देण्यात आल्या आहेत.
  •  काय आहे प्रकरण
बुधवार ९ जुलै रोजी एक तरुणी आपल्या आईसोबत डॉक्टर देवेश अग्रवाल याच्या श्याम हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी तपासणीसाठी गेली होती.यादरम्यान तिच्या आईला व नर्सला बाहेर ठेवून सुमारे अर्धा तास त्याने तिच्याशी अश्लील वर्तवणूक केली होती. सोनोग्राफीनंतर रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली.त्यानंतर घरी परतल्यावर मुलीने  घडलेला प्रकार वडिलांनाही सांगितला.डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही तर मुलीला संपर्क क्रमांक मागितला व याबाबत कोणालाही सांगू नये,असेही बजावले.तसेच यापूर्वीही इंस्टाग्रामवरून डॉक्टरकडून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट आल्याचा दावा करण्यात आला आहे.तक्रार होताच डॉक्टरने पलायन केले.दरम्यानच्या काळात त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र,न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.डॉक्टर देवेश अग्रवाल याच्या नावे असलेले आणि श्याम हॉस्पिटलच्या नावे असलेले बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहे. पोलिसांनी त्या संदर्भात संबंधित बँकांना पत्र दिल्यानंतर कारवाई झाली.तसेच आता त्याच्या रुग्णालयाचा परवानाही रद्द होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!