Saturday, September 12, 2026
Homeनागपूरनवजात बाळाला रुग्णालयात सोडून पळून गेलेल्या आईविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल..

नवजात बाळाला रुग्णालयात सोडून पळून गेलेल्या आईविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- ‘मज मायेची काया जशी ईश्वराची छाया’ या कवितेच्या ओळी प्रमाणे आपल्या पोटच्या गोळ्यांवर आई इतके प्रेम जगात कुणीही करत नाही.पण एका प्रकरणात जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला रुग्णालयात सोडून पळून गेलेल्या निष्ठुर आईविरुद्ध दीड वर्षानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी महिला ही नागपूरच्या एकतानगर येथील रहिवासी असून ३० वर्षीय समीम असे तिचे नाव आहे.समीमला नागपूरच्या मेयो रुग्णालयाच्या प्रसूती वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.१ डिसेंबर २०२३ रोजी तिने मुलाला जन्म दिला.त्यानंतर ती
रुग्णालयातून पळून गेली असता ८ डिसेंबर २०२३ रोजी उपचारादरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला.प्रकरणी डॉ.वेदांती महाले यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.तेव्हापासून या प्रकरणाचा तपास प्रलंबित होता.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा सागर यांनी तपास सुरू केला.नवजात मुलाच्या आजाराची माहिती असूनही,समीम त्याला सोडून पळून गेली. तिच्या कृत्यामुळे बाळाला जीव गमवावा लागला. या आधारावर,समीमविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तहसील पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा सागर यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!