Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीपुराच्या पाण्यात वाहून जाणारा ग्रामसेवक थोडक्यात बचावला; झाडाला ठेवले धरून.. - गडचिरोली...

पुराच्या पाण्यात वाहून जाणारा ग्रामसेवक थोडक्यात बचावला; झाडाला ठेवले धरून.. – गडचिरोली जिल्ह्यातील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी,मुलचेरा
 व इतर तालुक्यात आज,बुधवार २३ जुलै रोजी जोरदार पाऊस सुरू आहे.पावसामुळे नाले भरभरून वाहू लागलेत.काही ठेंगण्या पुलाच्यावरून पाणी वाहून पुल दिसेनासे होऊ लागले आहेत.अश्यातच जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे वय ४५ वर्षे हे आज बुधवारच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात अडकले.चारचाकी वाहनासह नाला ओलांडत असतांना वाहनाला जोरदार पाण्याचा लोंढा लागला आणि वाहन वाहून गेले.मात्र,प्रसंगावधान राखत  धोडरे यांनी एका झाडाला धरून ठेवले.या घटनेची माहिती मिळताच,महसूल विभाग,पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.अतिशय काळजीपूर्वक आणि समन्वयाने बचाव कार्य राबवून धोडरे यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.त्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून घरी रवाना करण्यात आले.जिल्हा प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली.मुसळधार पावसामुळे नाल्यांना अचानक पूर येण्याच्या घटना वाढल्या असून अशा ठिकाणी प्रवास करतांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे व पूलावरून पाणी वाहत असतांना पाण्यात गाडी न टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!