Wednesday, September 2, 2026
Homeभंडारातहसीलदाराच्या गैरवर्तणुकीबाबत सरपंच संघटना आक्रमक..!

तहसीलदाराच्या गैरवर्तणुकीबाबत सरपंच संघटना आक्रमक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एखादा पद मिळाला म्हणून ‘मेरीच सूनो’असे पूर्वी चालत होते.मात्र,आता काळानुरूप बदल होत चालला.आजच्या घडीला सगळीकडेच एकशे एक धुरंदर लोकं आहेत.अश्यातही तुम्ही आपलीच खरी करतो म्हणाल आणि तेही प्रशासनात ते कदापिही सहन केले जाणार नाही.अश्याच प्रकारे भंडाऱ्याचे तहसीलदार संदीप माकोडे यांच्या गैरवर्तणुकीच्या चर्चाच नाही तर प्रत्यक्षातील कृतीमुळे सरपंच संघटना आक्रमक झाली असून १८ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंत्र्यांना निवेदन पाठवत बदलीची मागणी केली होती. अश्यातच निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने परत भंडारा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तहसीलदार माकोडे हे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांशी व्यवहार करतांना वारंवार उद्धट व गैरवर्तनीचे वर्तन प्रदर्शित करत आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींचा अपमान होत असून ग्रामस्थांचा सन्मानही धुळीस मिळत आहे.शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अशी वर्तणूक अस्वीकार्य आहे; असे सरपंच संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे तहसीलदार संदीप माकोडे यांची तडकाफडकी बदली करावी,सरपंच तसेच भंडारा तालुक्याच्या जनतेचा अधिकार व सन्मान अबाधित राहावा,तहसील प्रशासनात हुकूमशाही व गर्विष्ठ प्रवृत्तीला आळा घालावा,असे म्हणत संतप्त सरपंचांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारून जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन सादर केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!