Saturday, August 29, 2026
Homeभंडारातलाठ्याने शेतकऱ्याकडून घेतली ७०० रुपयांची लाच..-तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात…

तलाठ्याने शेतकऱ्याकडून घेतली ७०० रुपयांची लाच..-तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- सात वर्षांपूर्वी शेतात बांधलेली विहीर आणि दोन वर्षांपूर्वी खोदलेली बोअरवेल ७-१२ उताऱ्यावर चढविण्यासाठी शेतकऱ्याकडून ७०० रुपयांची लाच स्वीकारणे भंडारा तालुक्यातील नेरी येथील तलाठ्याला चांगलेच महागात पडले आहे.शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिल्याने लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.अमोल पोरेड्डीवार वय ४४ वर्षे असे या तलाठ्याचे नाव आहे.

भंडारा तालुक्यातील नेरी गावात अमोल पोरेड्डीवार तलाठी म्हणून कार्यरत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,५ जुलै रोजी गावातीलच एका ६७ वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याने त्यांच्या शेतात दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या बोअरवेलची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी नेरी येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता.८ जुलै रोजी त्यांनी कार्यालयात जाऊन तलाठी अमोल पोरेड्डीवार याच्याकडे अर्जावर केलेल्या कार्यवाहीबाबत विचारणा केली असता,तलाठ्याने त्यांच्याकडे ७०० रुपयांची मागणी केली.शेतकऱ्याने भंडारातील लाचलुचपत कार्यालय गाठून तक्रार नोंदवली.त्याआधारे सापळा रचून काल,९ जुलै ला  शेतकऱ्याकडून ७०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी अमोल पोरेड्डीवारला रंगेहात पकडले.

कारवाईदरम्यान,आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, वरठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार,पोलिस निरीक्षक अमित डहारे आदींसह पथकाने ही कारवाई केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!