Sunday, June 21, 2026
Homeनागपूरतळपायाची आग मस्तकात जाताच सेवानिवृत्त वडीलाने सख्ख्या मुलावर झाडली गोळी…

तळपायाची आग मस्तकात जाताच सेवानिवृत्त वडीलाने सख्ख्या मुलावर झाडली गोळी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-सीआरपीएफच्या सेवानिवृत्त जवानाने क्षणिक संतापातून सख्ख्या मुलावरच गोळीबार केला. यात मुलगा जखमी झाला असून,थोडक्यात त्याचा जीव वाचला.अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून,यामुळे खळबळ उडाली आहे.माणिक पुंडलिक इंगळे वय ६८ वर्षे ओमसाईनगर,असे आरोपीचे नाव आहे.तर मुलगा नितीन इंगळे वय ३२ वर्षे हा जखमी झाला आहे.माणिक सैन्यदलातून सीआरपीएफमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर नागपुरातच वास्तव्याला आहे.त्यानंतर एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे.माणिककडे परवाना असलेली बोअर १२ची रायफल आहे.नितीनला एक मुलगा आहे.मुलाला शिस्त लागावी,यासाठी नितीन त्याला रागवायचा व वेळप्रसंगी हातदेखील उचलायचा.यामुळे माणिकराव व नितीनचे वाद होत होते.नितीन सध्या बेरोजगार आहे.माणिकचा नातवावर फारच जीव असल्याने त्याचा शाळेचा खर्च उचलला होता.सोमवारी रात्री कामावरून घरी आल्यावर नातू माणिकजवळ गेला. त्यावेळी नितीनने माणिकला उद्देशून चौकीदार आला, असे म्हटले.यावरून माणिक व नितीनमध्ये वाद पेटला.संतापाच्या भरात माणिकने १२ बोअरची रायफल आणली.नितीनने हिंमत असेल तर गोळी चालवूनच दाखव,असे म्हटल्याने माणिकच्या तळपायाची आग मस्तकात गेली.त्यातूनच गोळी झाडण्यात आली.गोळी नितीनच्या पायाला लागली. या आवाजामुळे खळबळ उडाली.नितीनच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली.

माणिक व नितीन यांच्या अगोदर देखील वाद झाले होते.दोघेही एकमेकांबाबत वाट्टेल तसे बोलायचे. नितीन लहान मुलाला मारायचा हे माणिकला पटत नव्हते.मात्र,कुठलाही वाद इतका विकोपाला गेला नव्हता.सोमवारी माणिक दारूच्या नशेत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला आहे.त्याने मुलावर थेट गोळी चालविताना नातवाचा विचार केला नाही का? असा सवाल नातेवाईक व शेजारी उपस्थित करत आहेत.ही गोळी मुलाच्या छातीत लागली असती किंवा त्याची पत्नी व नातवाला लागली असती तर अघटित घडले असते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!