Saturday, June 20, 2026
Homeभंडाराडोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार...

डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शंकरपट पाहून स्वगावी परतणाऱ्या एका ३५ वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील  शंकरपट पाहून दुचाकी क्रमांक एमएच ३५/जे-६८६ हिने आपल्या गावी जात असतांना जांभळी मार्गावर अचानकपणे दुचाकी अनियंत्रित होऊन खाली कोसळला.खाली कोसळताच तितक्यातच मागेहून भरधाव वेगाने अज्ञात ट्रक आला.अशातच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच ठार झाला.प्रमोद जैराम कापगते वय ३५ वर्षे रा.कटंगधरा/सासरा असे अज्ञात ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.घटना घडताच अज्ञात ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला.प्रकरणी साकोली पोलिसांची पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे.प्रमोद हा साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मजुरीचे काम करीत होता.त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!