Wednesday, September 9, 2026
Homeभंडाराट्रॅक्टरची डिव्हायडरला धडक; चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू..

ट्रॅक्टरची डिव्हायडरला धडक; चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर शहरात भीषण अपघाताची घटना घडून चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार २६ डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली.दक्ष अवसरे वय ४ वर्षे रा.लाखांदूर,जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.तर निलेश अवसरे वय २७ वर्षे,रा.लाखांदूर असे जखमी ट्रॅक्टर चालकाचे नाव असून मृत दक्ष हा पुतण्या असल्याची माहिती आहे.
ट्रॅक्टर चालक निलेश अवसरे,चिमुकला दक्ष व काही सहकारी आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास लाखांदूर शहरातून ट्रॅक्टरने जात होते.चालक निलेश हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने आपली साईड सोडून विरुद्ध साईडने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवीत असतांनाच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.यात ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला(दुभाजकाला)जाऊन धडकताच ट्रॉली पलटली.लागलीच शहरातील उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ लाखांदूर रुग्णालयात दाखल केले.मात्र,चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.अपघात प्रकरणी चालक निलेश अवसरे याचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस प्रशासन करीत आहे. चिमुकल्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!