Tuesday, October 27, 2026
Homeगडचिरोलीनायलॉन मांजा वापरल्यास पन्नास हजार तर विक्री केल्यास अडीच लाखांचा दंड..

नायलॉन मांजा वापरल्यास पन्नास हजार तर विक्री केल्यास अडीच लाखांचा दंड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे प्राणघातक अपघात आणि पक्ष्यांची होणारी जीवितहानी रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सार्वजनिक सूचना जारी करून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक आर्थिक दंडाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
उच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे दंड आकारण्याचे प्रस्तावित केले आहे:
अल्पवयीन मुलांसाठी पालकांना दंड: जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवतांना आढळला,तर त्याच्या पालकांना ५०,००० रुपये दंड का करू नये,अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. प्रौढ व्यक्तींना दंड: कोणतीही प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरतांना आढळल्यास ५०,००० रुपये दंड भरावा लागू शकतो.
विक्रेत्यांवर मोठी कारवाई: ज्या विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाचा साठा आढळेल किंवा जे याची विक्री करतील,त्यांना प्रत्येक उल्लंघनासाठी  २ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे.
जनतेला म्हणणे मांडण्याची संधी👇
न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार,ही कारवाई अंतिम करण्यापूर्वी जनतेला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे.ज्यांना या प्रस्तावित दंडात्मक कारवाईविरुद्ध निवेदन सादर करायचे आहे, अश्यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहून आपले म्हणणे मांडू शकतात.जर कोणीही सुनावणीला हजर राहिले नाही,तर जनतेचा या दंड वसुलीस कोणताही आक्षेप नाही,असे मानले जाईल.
नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!