Friday, August 28, 2026
Homeभंडाराजिल्हा परिषद सदस्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला झोडपले…

जिल्हा परिषद सदस्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला झोडपले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन पाचघरे यांना जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी मारहाण केली.या प्रकरणी राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने या मारहाणीचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.याबाबतचे निवेदन संघटनेने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अतुलकुमार टेंभुर्णे यांना दिले.

बुधवारी दि.१९ जून रोजी बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.पाचघरे हे कार्यरत असताना जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी कोणतेही कारण नसताना डॉ.पाचघरे यांना मारहाण केली.जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य न करता सूडभावनेतून मारहाण,मानसिक त्रास व जीवितहानीची भीती निर्माण करण्यात येत आहे.या संदर्भात डॉ.पाचघरे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मॅग्मा संघटनेने जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी; अशी मागणी केली आहे.या मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांना गुरूवारी देण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.मधुकर कुंभरे,डॉ.शंकर कैकाडे, डॉ.एम.पी.मोटघरे,डॉ.पवन पाचघरे,डॉ.व्ही.पी.मेश्राम, डॉ.रेखा रामटेके व सदस्य उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!