Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरजागतिक कुष्ठरोग दिन उत्साहात साजरा; कुष्ठभयमुक्तीचा संदेश..

जागतिक कुष्ठरोग दिन उत्साहात साजरा; कुष्ठभयमुक्तीचा संदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था अलर्ट इंडिया मुंबई व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम,राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय सावली यांच्या संयुक्त समन्वयाने जागतिक कुष्ठरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय सावली यांच्या वतीने कवठी येथे “राष्ट्रीय सेवा योजना”(NSS) शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्याअनुषंगाने “जागतिक कुष्ठरोग दिन” नुकताच साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कुष्ठरोग विषयीची शास्त्रीय माहिती देण्यात आली.त्यानंतर,विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर  कुष्ठरोगाची  लक्षणें,कुष्ठांतेयाचे अधिकार याबाबतची माहिती लिहुन कुष्ठांतेयासोबत कसलाही भेदभाव न करता सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा संदेश पत्रकाद्वारे उपस्थितांना देण्यात आला. तसेच चौका-चौकात फ्लिपचार्ट व बॅनर प्रदर्शनीच्या माध्यमातून माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.प्रसंगी गावातील प्रत्येक कुटुंबीयांना विद्यार्थ्यांच्या मार्फत शास्त्रीय माहिती देऊन तपासणी करण्यात आली व सर्वेक्षण दरम्यान संशयीतांची तपासणी करून रुग्णांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संदर्भीत करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आर.एम.वासेकर,प्रा.देवीलाल वसाके,प्रा.राजश्री मारखंडीवार,प्रा.प्रफुल वैराडे,आरोग्य विभागाचे प्यारा मेडिकल वर्कर प्रशांत बाबनवाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिती वनकर,आरोग्य सेविका मंगला पैकराव,जया मैदाळकर,आशा वर्कर संगीता गेडाम,प्रेमीला भोयर, सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था अलर्ट इंडिया मुंबईचे मिलिंद बारसींगे,सपना कंकडालवार,राकेश गडमवार, क्रिष्णा निकुरे,लता तुनकलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!