Thursday, May 28, 2026
Homeभंडाराजखमी अवस्थेत आढळून आलेल्या वाघिणीचा मृत्यू.. - वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह..

जखमी अवस्थेत आढळून आलेल्या वाघिणीचा मृत्यू.. – वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी गावानजिकच्या गोसेखुर्द धरणाच्या(इंदिरा सागर प्रकल्प) मुख्य उजव्या कालव्याच्या मार्गावर मंगळवार ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.प्रकरणी परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ वन विभागास दिली.माहिती मिळताच वनाधिकारी तसेच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पाहणी दरम्यान मादी वाघ असल्याचे निष्पन्न झाले. वाघीण जखमी असल्याने मार्गावर निपचित पडली होती. जखमी वाघिणीला पुढील उपचारांसाठी नागपूरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात हलवण्यात आले.रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांनी वाघाला धडक मारली असावी,असा कयास बांधला जात होता. अश्यातच आता जखमी अवस्थेत आढळून आलेल्या वाघिणीचा गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.विशेष म्हणजे,१५ महिन्यांच्या या अवयस्क मादी वाघिणीला कमरेखालील भागाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मागील भाग पूर्णपणे निकामी झाला होता.अकाली मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.पवनी वनपरिक्षेत्र हा उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा अत्यंत संवेदनशील कॉरिडॉर आहे.अशा संवेदनशील क्षेत्रात वाघिणीच्या बचाव कार्यात तब्बल चार तासांचा विलंब होणे,ही बाब वन विभागाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.बचाव पथकाकडे पिंजरा उपलब्ध नव्हता,त्यामुळे नवेगाव बांध येथून पिंजरा मागवण्यासाठी चार तास लागले.गंभीर जखमी वाघिणीला तातडीच्या उपचाराची आवश्यकता असतांना झालेला हा विलंबच तिच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरले आहे,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!