Saturday, July 25, 2026
Homeचंद्रपूरजंगलाशेजारी असलेल्या पडक्या घरात मादी बिबटने तीन बछड्यांना दिला जन्म…

जंगलाशेजारी असलेल्या पडक्या घरात मादी बिबटने तीन बछड्यांना दिला जन्म…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या बाळापूर गावात जंगलाशेजारी असलेल्या एका पडक्या घरात मादी बिबटने तीन बछड्यांना जन्म दिला आहे.सध्या तिन्ही बछडे तंदूरूस्त असून त्याच ठिकाणी वनविभागाच्या निगराणीत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.परंतु आता ताडोबाच नव्हे तर ताडोबाच्या बाहेरील जंगलातही वाघ आणि बिबट्यांचे नगारिक,शेतकरी,शेतमजुरांना दर्शन होणे नित्याची बाब झाली आहे.नागभिड तालुक्यात तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत तळोधी मेंडकी मार्गावर बाळापूर दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे.गावाशेजारी जंगल लागून आहे.त्यातील काही घरे जंगलालाच लागून आहे.जंगलाला लागून असलेल्या एका पडक्या घरातून सकाळच्या सुमारास एक बिबट घरातून बाहेर पडत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले.त्यामुळे नागरिक भयभित झाले.

बऱ्याच दिवसांपासून या गावात शेजारी बिबट्याने रात्री बेरात्री येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करणे सुरूच आहे.सोमवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने वनरक्षक मैंद यांना माहिती दिली.त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी येऊन काही नागरिकांना सोबत घेऊन त्या पडक्या घरात बघितले असता त्या ठिकाणी मादी बिबटचे तीन बछडे आढळून आले.ज्या घरात बछडे आढळले ते घर पडके आहे.त्या ठिकाणी कुणीही वास्तव्यास नाही.शिवाय तो घर जंगलाला लागून आहे. वनरक्षक मैंद यांनी,नागभिडचे वनपरिक्षेत्राधिकारी सुनील हजारे यांना माहिती दिली.त्यांच्या मार्गदर्भात तळोधी (बा.)राऊंड ऑफिसर नेरलवार व त्यांच्या चमुने घटनास्थळी भेट दिली.त्यांना घरात बिबटचे बछडे आढळले.घर आणि सभोवती परिस्थिची पाहणी केली.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार,बछडे सात आठ दिवसांपूर्वी जन्मास आले आहेत.दिवसा मादी बिबट या ठिकाणी राहत नाही.रात्रीच्या वेळी मादी बिबटचे वास्तव्य आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

तब्बल सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी सापडली पतीसोबत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बारावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सहा महिन्यांपूर्वी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मात्र,मुलीची काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी.. – भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका ॲड.मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!