- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून राज्यभरातून तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे.प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आज,बुधवार १९ नोव्हेंबरला देसाईगंज सोनार समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून संताप व्यक्त करत देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.चिमुकली सोबत एका हरामखोराने शारीरिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केली,अश्या हरामखोर विजय खैरनार याचा देसाईगंज सोनार समाजातर्फे जाहिर निषेध करण्यात येत आहे व अश्या हत्याऱ्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना रविवार, १६ नोव्हेंबरला घडली.१६ नोव्हेंबर रोजी गावातील एका २४ वर्षीय विजय संजय खैरनर याने चिमुकलीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले.प्राथमिक तपासात, आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत एक महिन्यांपूर्वी भांडण झाले होते.त्याचा राग आरोपीच्या मनात होता.नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केले.पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली व त्यानंतर न्यायालयाने आरोपील उद्या,गुरुवार २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
- Advertisement -

