- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील प्रख्यात असलेल्या सोनी-चप्राडच्या दुर्गा माता मंदिर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वलाचे दर्शन होऊ लागल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या शेकडो भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विशेष म्हणजे,मागील सहा महिन्यांपासून एका अस्वलाची मंदिर परिसरात भटकंती सुरू असून दोन दिवसांपूर्वीच ती मंदिर परिसरात निर्भयपणे वावरतांना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अस्वलाच्या भीतीने एकेकाळी रात्री उशिरापर्यंत गजबजलेला मंदिर परिसर आता सायंकाळच्या सुमारास रिकामा होत आहे. पहाडीवर दाट जंगल नसल्याने अस्वलाचा मानवी वस्तीत आणि मंदिर परिसरात वावर वाढला आहे.दोन महिन्यांपूर्वीच दुर्गा माता मंदिर समितीने स्थानिक वनविभागाला लेखी निवेदन देऊन अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.मात्र,अद्याप कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई वा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने एखादेवेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही,याकरीता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी भाविक तसेच नागरिकांनी केली आहे.
- Advertisement -

