Thursday, September 10, 2026
Homeभंडाराअखेर 'त्या' शेतकरी महिलेची प्राणज्योत मावळली; वाघाने मानेला पकडुन नेले होते फरफटत..

अखेर ‘त्या’ शेतकरी महिलेची प्राणज्योत मावळली; वाघाने मानेला पकडुन नेले होते फरफटत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा परिसरात वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान साकोली तालुक्याच्या उमरझरी शेतशिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी होते.माया रामकृष्ण सोनवाने वय ४८ वर्षे,रा.उमरझरी,ता.साकोली,जि.भंडारा
आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनवाने हे शनिवारच्या सकाळी उमरझरी शेत शिवारात शेतातील हिरव्या मिरच्या तोडत असतांनाच शेतालगतच्या जंगल परिसरातून आलेल्या वाघाने अचानक माया सोनवाने यांच्यावर हल्ला केला आणि महिलेच्या मानेला पकडून काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते.दरम्यान,जवळच असलेल्या रामकृष्ण यांनी आरडाओरडा केली असता बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले होते.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी माया सोनवाने यांना खासगी वाहनाने तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ
भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.या ठिकाणी उपचार सुरू असतांनाच प्रकृती अधिक खालावल्याने वनविभागाने त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.या दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा (लकवा)झटका आला होता.विशेष म्हणजे,वाघाने माया सोनवाने यांच्या मानेला तसेच इतर शरीरावर खोल जखमा केल्याने तब्बल पाच दिवस उपचार सुरू असतांनाच त्यांचे काल बुधवारच्या रात्रीच नागपुरात निधन झाले.घटनेने सोनवाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!