Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरग्रामसेवक रामटेके लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

ग्रामसेवक रामटेके लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्याच्या लोंढोली ग्रामपंचायत येथे कार्यरत ग्रामसेवक चंद्रशेखर केशव रामटेके यास १० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी २६ फेब्रुवारीला उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
माहितीनुसार,प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत घरकुल मंजूर झालेल्या तक्रारदारास दुसऱ्या हप्त्याची रक्कम काढून देण्यासाठी रामटेके यांनी २० हजाराची लाच मागितली होती.अगोदरच शासनाकडून घरकुल बांधकामासाठी दिली जाणारी रक्कम तुटपुंज्या स्वरूपात असल्याने बरेच लाभार्थी जुळवा-जुळव करून घरकुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करीत असतात.अशातच तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने याबाबत चंद्रपुरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.मंगळवार २५ फेब्रुवारीला दिलेल्या तक्रारी संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली व त्यानुसार सापळा रचला.२० हजार रुपयांपैकी तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.त्यानुसार लाचलुचपतने सापळा रचून रामटेके यांस १० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले,नरेशकुमार नन्नावरे,हिवराज नेवारे,प्रदीप ताडाम,पुष्पा काचोळे,संदिप कौरासे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!