Tuesday, July 21, 2026
Homeनागपूरफेसबुकवरून ओळख झालेल्या प्राध्यापक महिलेचे एसआरपीएफ जवानाकडून लैंगिक शोषण..

फेसबुकवरून ओळख झालेल्या प्राध्यापक महिलेचे एसआरपीएफ जवानाकडून लैंगिक शोषण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झालेल्या प्राध्यापक महिलेचे राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने वर्षभरापासून  लैंगिक शोषण केल्याची तक्रार विवाहित प्राध्यापिकेने दाखल करताच कोंढाळी (ता.काटोल) पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.सदर आरोपी पसार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.प्रवीण पुंजाजी सपकाळ वय ४० वर्षे असे आरोपी जवानाचे नाव असून,तो हिंगणा येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये कार्यरत आहे.३५ वर्षीय पीडित महिला ही दत्तवाडी,वाडी,ता.नागपूर (ग्रामीण) येथे राहते.दोघेही २७ एप्रिल २०२४ रोजी पहिल्यांदा कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टार की पॉइंट रिसॉर्ट गेले होते.या रिसॉर्टमध्ये त्याने पहिल्यांदा तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. वर्षभरापासून त्याने पतीला माहिती देऊन तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला.अत्याचार असह्य झाल्याने तिने कोंढाळी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.तिच्या तक्रारीवरून कोंढाळी पोलिसांनी प्रवीण सपकाळच्या विरोधात गुन्हा नोंदविला असून,घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.पीडित महिला ही बीई(BE)असून,ती खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.तिची व प्रवीणची ओळख फेसबुकवरून झाली.पुढे या ओळखीचे रूपांतर त्यांच्या मैत्रीत झाले.याच मैत्रीचा फायदा घेत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.तिने वाडी पोलिस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र,सर्वप्रथम घटनास्थळ कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने वाडी पोलिसांनी तिला कोंढाळी ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सूचना केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!