- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-कोरोना महामारीच्या कालावधीपासून ते कित्तेक महिने लोटूनही गोंदिया-वडसा-चंद्रपूर पॅसेंजर रेल्वे गाड्यांची चाके रुळावर थांबलेली होती.अशातच गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान निवडून येताच; त्यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात डेमू ट्रेन क्र.०८८०८,०८८०५ आणि ०८८०६ या पॅसेंजर रेल्वे गाड्या संदर्भात रोखठोक इंग्रजीत संभाषण ठोकत सरकारला जाब विचारून सर्वसामान्य नागरिक,व्यापारी वर्ग,विद्यार्थी तसेच इतरांसाठी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात; अशी मागणी केली होती.त्यानुसार आज एक पॅसेंजर रेल्वेगाडी तर उद्याला दोन पॅसेंजर रेल्वेगाड्या रुळावर पूर्ववत धावणार असल्याने खासदार नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांचे फलित झाले आहे.त्यासाठी उद्या ८ सप्टेंबरला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास रेल्वे गाड्यांच्या स्वागतासाठी राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे उपस्थित राहून रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखविणार आहेत.त्यासाठी तालुक्यातील सर्व इंडिया- महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सकाळच्या सुमारास देसाईगंज रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

