Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता ग्रामपंचायत स्तरावर 'स्वच्छ माझे अंगण' अभियान..

आता ग्रामपंचायत स्तरावर ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नागरिकांना स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान राबविण्यासाठी सुरुवात झाली आहे.१ ते २५ सप्टेंबर या कालावधीमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.यामध्ये स्वच्छतेबाबत कुटुंब स्तरावर सर्व बाबींचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबाचा ग्रामपंचायतीकडून गौरव करण्यात येणार आहे.
या अभियानाची अंमलबजावणी करताना स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन,सांडपाणी व्यवस्थापन राबवित असलेल्या,तालुक्यातील सर्व कुटुंब स्तरावर या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन,नित्य नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी,जे कुटुंब वैयक्तिक शौचालय,सांडपाणी व्यवस्थापनाकरिता शोषखड्डा,परसबाग,बाजारखड्डा तसेच घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा, अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंब स्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली असून,त्यांचा नियमितपणे वापर करतात; अशा कुटुंबांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे अनुकरण करण्यासाठी इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्याप्रमाणेच वैयक्तिक स्वरूपाच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी उद्युक्त करणे,या बाबींवर सदर अभियानामध्ये भर देण्यात येणार आहे. स्वच्छतेबाबत कुटुंब स्तरावर प्रत्येक घटकांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी गावातील सर्व कुटुंबांमध्ये स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्याबाबत शासनाच्या वतीने निर्देश देण्यात आले आहेत.उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना २ ओक्तोंबरला म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात यावे; असे शासन स्तरावरून निर्देश आहेत.त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींना सूचना दिल्या गेलेल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!