Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीप्रशासनाला आता आली जाग.. जीमलगट्टा येथे अंधश्रद्धा निर्मूलन व वैद्यकीय उपचाराच्या प्राथमिकतेची...

प्रशासनाला आता आली जाग.. जीमलगट्टा येथे अंधश्रद्धा निर्मूलन व वैद्यकीय उपचाराच्या प्राथमिकतेची शपथ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील दोन बालकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जनसामान्यात असलेल्या अंधश्रद्धा व तातडीच्या वैद्यकीय उपचाराविषयीची अनास्था याबाबत जनजागृतीची निकड लक्षात घेता; अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत अभिनव लोकजागर मोहीम राबवून जीमलगट्टा परिसरातील नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलनाची व प्राधान्याने वैद्यकीय उपचार घेण्याची शपथ दिली.
नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात असलेल्या  येर्रागड्डा येथे प्रत्यक्ष जाऊन मृत्यू पावलेल्या  मुलांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांची सांत्वना,घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी चौकशी करून दुःख ओढवलेल्या दांपत्याच्या उपस्थितीत गावकऱ्यांसोबत संवाद साधत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी माडिया व तेलगू भाषेत शपथ घेण्यात आली.जीमलगट्टा येथे परिसरातील सर्व आशा वर्कर,ग्रामसेवक तलाठी,मंडळ अधिकारी, कोतवाल, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आणि उपकेंद्राचे  वैद्यकीय अधिकारी,गटविकास अधिकारी अहेरी,तालुका आरोग्य अधिकारी अहेरी,परिसरातील गावांचे उपसरपंच गोविंदगाव,येर्रागड्डा,जिमलगट्टा आणि मोठ्या संख्येने नागरिक,युवक आणि विद्यार्थी यांचे उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन बाबत तेलुगु व माडिया भाषेत संवाद साधण्यात आला.सर्वांना अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ देण्यात आली.यावेळी उपस्थित गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या बाबतीत  सामान्य जनतेला प्रत्यक्ष मिळालेले लाभ आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या निराकरण करण्याचे निर्देश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले.आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य सेवा पुरवण्याचे तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि अशा दुर्गम भागात सेवा देण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जीमलगट्टा, उपकेंद्र गोविंदपुर येथे भेट देऊन वैद्यकीय अधिकारी आणि  रुग्णांशी संवाद साधण्यात आला..   लोकजागराचे पोस्टर्स गावामध्ये लावण्याची  कार्यवाही करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि गावाचे विकासदूत बनण्यासाठी स्थानिकांना विशेषतः युवकांना आवाहन करण्यात आले.
अशी देण्यात आली शपथ👇
माझे जीवन अमूल्य आहे तसेच माझ्या परिवारातील,  समाजातील आणि या देशातील सर्वांचे जीवन अमूल्य असून तोच विकासाचा आधारबिंदू आहे याची मला जाणीव झाली आहे.यापुढे मला किंवा इतरांना कोणत्याही प्रकारचा आजार  झाल्यास मी तात्काळ  नजीकच्या दवाखान्या मध्ये जाऊन उपचार घेईल. पुजारी,गावठी वैदू यांच्यावर विश्वास ठेवल्यास  जीवन धोक्यात येऊ शकते याची मला पूर्णपणे जाणीव झाली आहे.या पुढे मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही; अशी मी ईश्वर साक्षीने शपथ घेत आहे… जय सेवा…..
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!