उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी (गडचिरोली):- तालुक्यातील पळसगाव येथिल गुरूदेव विनंता विलास मोहुर्ले, या तरूणाची भोपाळ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नाट्य स्पर्धेसाठी ११ फेब्रुवारी रोजी निवड झाली आहे.
गुरूदेव ला लहान पनापासूनच अभिनयाची गोडी होती.जिल्हा परिषद शाळेतून सुरू केलेला प्रवास पुढे गुरूदेव ला महाविद्यालयात सुद्धा त्याच्या कलेमुळे एक विशिष्ट ओळख देऊ लागला; महाविद्यालयीन काळात त्यानी इंद्रधनुष्य सारख्या विद्यापीठ स्तरीय कार्यक्रमांत महाविद्यालयचे नेतृत्व केले आहे. आरमोरी तालुक्यातील विवीध गावांत NSS टिम पथनाट्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, दारूबंदी,मतदान जनजागृति अश्या अनेक विषयांवर जनजागृति चे काम केले आहे.गावा -गावात सुद्धा दरवर्षी पुढाकार घेत नाटकेचे आयोजन करणे व कलांकारांच्या साथीने गावकऱ्यांचे मनोरंजन करणे व समाजाला संदेश देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या पुर्वी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या प्रशिक्षण शिबीरात सुद्धा त्याची निवड झाली असुन,मार्गदर्शक, संगीता टिपले आणि अनिरूद्ध वनकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी अभिनयाचे धडे घेतले आहे.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले मार्गदर्शक लक्ष्मी मॅम, अनिरूद्ध वनकर,संगीता टिपले,आई वडिल तसेच पळसगाव येथिल मार्गदर्शक सहकाऱ्यांना दिले आहे.

