Wednesday, July 22, 2026
Homeचंद्रपूरगतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात-कठोर शिक्षा देण्याची मागणी... -प्रदेश युवक काँग्रेसच्या...

गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात-कठोर शिक्षा देण्याची मागणी… -प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नागभीड येथे गत १२ दिवसांपूर्वी एका गतिमंद महिलेवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली.या घटनेतील आरोपींला कठोर शिक्षा देण्यात यावी; अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांना निवेदनातून केली आहे.
नागभीड शहरातील एक गतिमंद महिला एकटी फिरत असल्याचे पाहून काही आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.एवढेच नव्हे तर अत्याचाराचा व्हिडीओ काढून आरोपींपैकी एकाने समाज माध्यमावर व्हायरल केला.या घटनेची माहिती मिळताच प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी नागभीड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकारणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांना निवेदन दिले. राज्यात नुकत्याच घडलेल्या बदलापूर,अकोला जिल्ह्यातील घडलेल्या अमानुष घटनांच्या तसेच नागभीड येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी; अशी मागणी केली.याप्रसंगी काँग्रेसचे चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजुरकर,ओबीसी संघटक धनराज मुंगले, नागभीड तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी,महिला तालुकाध्यक्ष प्रणया गड्डमवार,सिंदेवाही तालुकाध्यक्ष सीमा सहारे,सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सुचक,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयश्री कावळे,माजी नगरसेवक प्रतिक भसीन,युवक काँग्रेस शहराध्यक्ष महेश कुर्जेकर,युवक काँग्रेस महासचिव अमोल वानखेडे,युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे, सिंदेवाही अध्यक्ष अभिजित मुपीडवार, गजानन उरकुडे, प्रशांत गेडाम,संकेत वारजुकर, संदीप सातव,भूपेश कोरे,पारस नांगरे, रूपाली रत्नावार, निमंत्रिका कोकोडे,प्रीती गुरणुले, रजनी काऊलकर,महेश मंडलवार,निकू भैसारे,रोशन वारजूरकर,अंकुश सिडाम तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, बुधवार २२ जुलै रोजी ५६ वा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार...

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!