- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-नागरिक आरोग्य रक्षक संस्था देसाईगंज व विनायक शिक्षण संस्था विसोरा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर व वोलकार्ट फाउंडेशन इंडियन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील धनंजय नाकाडे माध्यमिक आश्रम शाळेत मोफत नेत्ररोग तपासणी तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकताच संपन्न झाला.आयोजित शिबिरात एकूण ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली,तर ४२ रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.त्यांची शस्त्रक्रिया नागपूर येथील महात्मे रुग्णालय येथे करण्यात येणार आहे.सदर शिबिराचे आयोजन विनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाना नाकाडे,नागरिक आरोग्य रक्षक संस्थेचे सचिव लतीफ शेख यांनी केले.शिबिरात महात्मे रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर निधी मांडवकर,प्रफुल वकुंडे,हुरिया शेख, सम्यक नाईक,रितू सेलोटे,विजय पांडे इत्यादींनी सेवा दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे,धनंजय नाकाडे माध्यमिक आश्रम शाळा कोकडी,शाळेचे सर्व शिक्षकवृंद तथा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
- Advertisement -

