Sunday, August 9, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या कांबळी यांचा सत्कार..

कोंढाळा येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या कांबळी यांचा सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असणाऱ्या कोंढाळा येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या कांबळी यांचा नुकताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार रामदास  मसराम,गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा राऊत यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्या कांबळी ह्या नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय राहतात,त्या अलर्ट इंडिया मुंबई या संस्थेच्या माध्यमातून समाजातील कुष्ठ रुग्णांना सेवा,सुविधा देऊन त्यांचे अधिकार हक्क मिळवून देण्यासाठी पुरेपुर मदत करतात.शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असतात.विद्या कांबळी यांनी आजतागायत बरेच कुष्ठ रुग्णांना व समाजातील गोर-गरीब,सर्वसामान्य गरजु लोकांना  संजय गांधी,श्रावणबाळ योजना व इतर अश्या अनेक शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.त्यांच्या सामाजिक कार्यांची  दखल घेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार रामदास मसराम,गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा राऊत यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच पार पडलेल्या सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या स्थापनादिनी सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा तुळशी ग्रामपंचायत सरपंच चक्रधर नाकाडे,अवार्ड संस्थेचे संचालक गुणवंत वैदये,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी गहाणे,कुष्ठांतेय अधिकार मचांचे सदस्य लतीफ शेख,कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ.दिनकर संदोकर, आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीचे अध्यक्ष महेंद्र खरकाटे चिखली,सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे अध्यक्ष माहादेव चौधरी,मिलिंद बारशिंगे,श्रावण हांडेकर, नारायण उरकुडे यांचेसह अलर्ट इंडिया संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मोठ्या संख्येने कुष्ठांतेय बंधु भगिनी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!