Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीपत्रक काढून नक्षलवाद्यांची सरकारविरोधात आगपाखड..

पत्रक काढून नक्षलवाद्यांची सरकारविरोधात आगपाखड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षली कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.नुकतेच २१ मे रोजी नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला होता.झालेल्या चकमकीत २७ जण ठार झाले होते.या सर्वांच्या स्मरणार्थ आणि सरकारचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांकडून येत्या १० जूनला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य भूपती उर्फ अभय याने यासंदर्भात पत्रक जारी केले असून सोबतच देशभर ‘स्मारक’ सभादेखील आयोजित करणार असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.चार दशकांनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा इतका मोठा नेता मारला गेल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे.यावर नक्षलवाद्यांनी पत्र काढून सरकारविरोधात आगपाखड केली आहे.केंद्र सरकारने शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत २१ मे रोजी २७ नक्षलवाद्यांची हत्या केल्याचा आरोप केंद्रीय समितीने काढलेल्या पत्रकात करण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या याच धोरणाचा विरोध करण्यासाठीच येत्या १० जूनला देशव्यापी बंदचे आवाहन ही नक्षलवाद्यांनी केले आहे.बसवराजूसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूने पार्टीला मोठा धक्का बसला.१९७२ मध्ये नक्षल चळवळीचा संस्थापक चारू मुजुमदारच्या मृत्यूनंतरही असेच दावे केले जात होते.मात्र,१९७८ दरम्यान आंध्र प्रदेशसह अनेक राज्यात चळवळ पुन्हा उभी राहिली.१९९९ मध्येही केंद्र समिती सदस्य श्याम, मुरली आणि महेशला ठार करून प्रशासनाने असाच दावा केला होता.मात्र,ही चळवळ सुरूच राहिली. चारू मुजुमदारनंतर गेल्या ५३ वर्षांत अनेक मोठे नेते मारले गेले.तरीही ही चळवळ पुन्हा उठून उभी राहिली. जोपर्यंत देशात शोषण आहे,तोपर्यंत आम्ही संपणार नाही,असे नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने पत्रकात म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!