Tuesday, June 23, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू…-देसाईगंज तालुक्यातील आजची घटना…

कोंढाळा येथील इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू…-देसाईगंज तालुक्यातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका ६४ वर्षीय इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक- २० मे रोजी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे घडली.तुळशीदास शेंडे असे मृताचे नाव आहे.

आज,सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तुळशीदास शेंडे व इतर दोघेजण शेतावर आंबे  तोडण्यासाठी गेले होते.तुळशीदास हे आंबे तोडण्यासाठी झाडावर चढले असता; झाडावरून पाय घसरून पडले.त्यात त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव तसेच शरीरावर जबर मार लागल्याने जखमी झाले.जखमी अवस्थेत त्यांना सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घरी आणण्यात आले.त्यानंतर तुळशीदास यांचे स्वास्थ्य बिघडू लागल्याने त्यांना उपचाराकरिता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर उपचार करतेवेळी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान तुळशीदास शेंडे यांची प्राणज्योत रुग्णालयातच मावळली.तुळशीदास यांच्या पश्चात मुलगा,सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.तुळशीदास शेंडे यांच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!