Saturday, August 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआयकर विभागाने टाकला छापा अन् चप्पल व्यापाऱ्याकडे निघाली ४० कोटी ची रक्कम…-रोकड...

आयकर विभागाने टाकला छापा अन् चप्पल व्यापाऱ्याकडे निघाली ४० कोटी ची रक्कम…-रोकड मोजताना बँकेचे कर्मचारीही गेले थकून… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- काही व्यावसायिकांकडून करचोरी केली जात असल्याच्या संशयावरून आयकर विभागाने रविवारी सकाळी आग्रा येथील चप्पल व्यापाऱ्याकडे छापे टाकले.या वेळी व्यापाऱ्याकडे नोटांचा ढीग पाहून आयकरचे अधिकारीही चक्रावले.अधिकाऱ्यांनी दिवसभरात ४० कोटींची रोकड जप्त केली.परंतु अजूनही नोटांची मोजदाद सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी आग्ग्रातील तीन चप्पल व्यावसायिकांकडे छापेमारी केली.त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती आढळून आली.५०० च्या नोटांचा ढीग पाहून अधिकाऱ्यांना त्यांची मोजणी करण्याचेही आव्हान होते.या नोटा मोजण्यासाठी त्यांनी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण केले.

मशीनच्या मदतीने रोकड मोजताना बँकेचे कर्मचारीही थकून गेले.दिवसअखेर ४० कोटींची रोकड मोजून झाली होती.उर्वरित रोकड मोजण्याचे काम सुरू असल्याने हा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. छापेमारी केलेले व्यापारी नेमके कोण आहेत,त्याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!